औरंगाबाद -दिवाळीत अंतरात्मा प्रभावित करणारे दिवे लावा, पर्यावरण दूषित करणारे नको, असे आवाहन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांनी केले आहे. भारतात 15 टक्के तर देशात 7 टक्के प्रदूषण नियंत्रणात आले आहे. मात्र, आता पुन्हा त्याच उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत देसरडा यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ देसरडा यांची प्रतिक्रिया कोरोना औषधांमुळे नाही, तर ऑक्टोबर हिटमुळे नियंत्रणात कोरोना सध्या नियंत्रणात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा आपल्या आरोग्यव्यवस्थेमुळे नाहीतर ऑक्टोबरमध्ये असलेल्या उष्णतेमुळे नियंत्रणात आला आहे. वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा आहेत. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याबाबत प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे आजाराची धास्ती नाही, तर काजळी केली पाहिजे, असे मत देसरडा यांनी व्यक्त केले.
गांधी पुतळ्याजवळ आत्मभान आंदोलन करणार-
पर्यावरण वाचवण्यासाठी सरकारने कायदे केले पाहिजे. नियम तयार केले पाहिजेत. मात्र, सर्वसामान्यांनी शिस्त पाळली पाहिजे. माणसांकडून चुका होतात. त्या चुकांसाठी आत्मभान आंदोलन करणार असल्याची घोषणा एच. एम. देसरडा यांनी केली. वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन असून पर्यावरणच आपल्याला वाचवू शकते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ दिवाळीच्या दिवशी प्रार्थना करणार असल्याचे देसरडा यांनी सांगितले.
रोज दहा हजार लोक उपाशी झोपतात-
समाजात विषमता वाढत चालली आहे. एका सर्व्हेनुसार औरंगाबाद शहरात रोज किमान दहा हजार लोक उपाशी झोपत आहेत. तर दुसरीकडे काही लोक रोज आपल्याला काय खायचे आहे, याचा विचार करत आहे. त्यामुळे ही विषमता दिवाळीच्या शुभ दिनापासून कमी करायला पाहिजे. बहुतांश कुटुंबांमध्ये 20 टक्के लोक लठ्ठ आहे. 40 टक्के माणसाच्या पोटात अन्न जात नाही. त्यामुळे या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे मत देसरडा यांनी व्यक्त केले.
कोरोनापासून कोणी सुटू शकत नाही-
कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हा आजार कोणाला सोडत नाही आहे. मग जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प असो, देशाचे गृहमंत्री अमित शहा, अभिनेता अमिताभ बच्चन, राज्याचे मंत्री अजित पवार असो, कोणीही यातून सुटणार नाही. सात्विक अन्नच आपली सुटका करू शकते. त्यामुळे दिवाळीच्या शुभमुहूर्तवर सात्विक अन्न ग्रहण करण्याचा निश्चय केला पाहिजे. तरच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि आपण कोरोनाला हरवू शकतो, असे मत देसरडा यांनी व्यक्त केले.