सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा भरती मोहिमेत नियुक्ती पत्र प्राप्त होणाऱ्या युवकांनी आनंद व्यक्त केला आहे. पहिल्या टप्प्यात देशभरात जवळपास 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्र सोपवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसोबत संवादही साधला. या योजनेंतर्गत पुढील दीड वर्षांत म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख तरुणांना नोकरी देण्याचे लक्ष्य आहे. सोलापूर रेल्वे ऑफिसर क्लबमध्ये हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोजगार मिळाला; सोलापुरमध्ये उमेदवारांना नियुक्तीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा भरती मोहिमेत नियुक्ती पत्र प्राप्त होणाऱ्या युवकांनी आनंद व्यक्त केला आहे. पहिल्या टप्प्यात देशभरात जवळपास 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्र सोपवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसोबत संवादही साधला. या योजनेंतर्गत पुढील दीड वर्षांत म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख तरुणांना नोकरी देण्याचे लक्ष्य आहे. सोलापूर रेल्वे ऑफिसर क्लबमध्ये हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
देशभरात जवळपास 11 हजार जणांना नोकरी मिळणार - सोलापूर सह इतर जिल्ह्यातील मराठी भाषिक तरुण व हिंदी भाषिक तरुणांनी 2019 साली रेल्वे परीक्षा दिल्या होत्या. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवकांना सोलापूर रेल्वे प्रशासनाच्या वतीने नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. सोलापुरातील एका वरीष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या देशभरात जवळपास 11 हजार जणांना नोकरी मिळणार आहे अशी माहिती दिली आहे.
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर युवकांना रोजगार -सोलापूर रेल्वे मंडळात झालेल्या रोजगार मेळावा कार्यक्रमात नांदेड, सोलापूर, लातूर, बिहार, अलिगढ, आदी जिल्ह्यातील युवक नियुक्तीसाठी आले होते. माहिती देताना सांगितले की, 2019 या वर्षांत परीक्षा दिली होती. परीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्याने या उमेदवारांनी निवेदने दिली. आंदोलने केली, तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज नियुक्तीपत्र मिळत आहे. सरकारी नोकरी मिळत असल्याने आनंद द्विगुणित झाल्याची माहिती यावेळी युवकांनी बोलताना दिली आहे.