सोलापूर - सोलापुरात उष्णतेने यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांची तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सोलापुरात ४४.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मागील चार वर्षाच्या काळात प्रथमच सोलापूरचे तापमान हे ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
सोलापुरात पारा ४४.३ अंशावर, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद
आजच्या या तापमानामुळे उष्णतेच्या तीव्र झळांनी सोलापूर जिल्हा भाजून निघाला येथील हवामान खात्याकडे झालेल्या नोंदीप्रमाणे शुक्रवारी ४४.३ अंश सेल्सिअस तर गुरुवारी ४२.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये काही अंशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानाचा पारा खाली गेला होता. मात्र, शुक्रवारी तापमान हे ४४.३ अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. आजच्या या तापमानामुळे उष्णतेच्या तीव्र झळांनी सोलापूर जिल्हा भाजून निघाला येथील हवामान खात्याकडे झालेल्या नोंदीप्रमाणे शुक्रवारी ४४.३ अंश सेल्सिअस तर गुरुवारी ४२.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच उष्णतेच्या झळा जाणवत होत्या. दुपारी मुख्य बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी सुद्धा नव्हती तसेच रस्त्यावर सुद्धा कोणी फिरताना दिसत नव्हते मागील चार दिवसांपासून सोलापुरातील तापमानाचा पारा ४० अंशा पुढेच राहिलेला आहे. शुक्रवारी तापमानाचा पारा हा यंदाच्या मोसमातील सर्वाधिक झाल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. दुपारी रस्त्यावर सर्वत्र नागरिकांचा शुकशुकाट पाहायला मिळाला. उन्हाची तीव्रता आणखी दोन-चार दिवसात वाढण्याची शक्यता असल्याचे पुण्याच्या वेधशाळेने वर्तविला आहे.