सोलापूर - शहरातील बसस्थानका समोरील अनिल कॉटेज येथे चाललेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक शाखेने हा छापा टाकून चार संशयित आरोपींवर कारवाई केली आहे. तसेच डांबून ठेवलेल्या दोन पीडित महिलांची सुटका देखील केली आहे.
सोलापूर वेश्या व्यवसाय कारवाई चार आरोपींना अटक
शहराच्या मधोमध एसटी स्टँडसमोर अनिल कॉटेज नावाचे लॉज आहे. त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. यानुसार एका बनावट गिऱ्हाईकाद्वारे पडताळणी करण्यात आली. 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास या कॉटेजवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान दोन पीडित महिला आढळल्या. या महिला पश्चिम बंगालमधील असून त्यांना जबरदस्ती या व्यवसायात आणले गेल्याची माहिती मिळाली. यात चार आरोपींनी या पीडितांना डांबून ठेवले होते. पोलिसांनी या पीडित महिलांची सुटका करून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. विकी उर्फ विक्रम महादेव पवार, गिरीष अनिल पवार, मोहसीन सरदार तांबोळी आणि सुतार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र बंडगर, महादेव बंडगर, शंनूराणी इनामदार, नफिसा मुजावर, तृप्ती मंडलिक यांनी केली आहे.
हेही वाचा -एफसी गोव्याचा फुटबॉलपटू इगोर अंगुलोची ईटीव्ही भारतशी बातचीत
हेही वाचा -...ही तर अपयशाचीच वर्षपूर्ती - रामदास आठवले