महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्लु डायमंडने सजला विठूरायाचा गाभारा.. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सावळ्या विठ्ठलाचे मंदिर आकर्षक रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले होते. ब्लू डायमंड फुलामध्ये सावळ्या विठू रायाची मूर्ती अधिकच लोभस दिसत होती. यावेळी भाविकांनीही मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

By

Published : Jan 1, 2020, 4:58 PM IST

Updated : Jan 1, 2020, 5:08 PM IST

सोलापूर- नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा गाभारा या आकर्षक फुलांच्या सजवटीने खूलून दिसत आहे. हे नयनरम्य दृष्य पाहून भाविकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी

देशभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने नव वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक लॅव्हेन्डर फुलांनी(ब्लू डायमंड) सजवले आहे. देवाचा गाभारा, सोळखांभी मंडप, चौ खांबी मंडप या निळसर फुलांनी सजवला आहे. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री विठुरायचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरीत पहाटे पासूनच गर्दी केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक नेत्यांनी देखील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.

राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, शेतकऱ्यांना हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. तसेच शेतकरी कर्जमुक्त व्हावा.अशाप्रकारेचे साकडे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी आल्यानंतर श्री विठ्ठलाकडे घातले असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.

Last Updated : Jan 1, 2020, 5:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details