महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूकीचे अचूक काम करावे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकाऱ्याच्या सूचना

निवडणुकीची कामे अचूक करा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना..लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवडणुकीचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

By

Published : Mar 10, 2019, 1:35 PM IST

निवडणुकीचे प्रशिक्षण

सोलापूर- लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी हे निवडणूक आयोगासाठी काम करणार आहेत. या नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम अचूक करावी, अशा सूचना सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिल्या आहेत.

निवडणुकीचे प्रशिक्षण

लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवडणुकीचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोलापुरातील रंगभवन सभागृहात मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाच्या कामाविषयी यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी यावेळी क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. निवडणुकीचे काम हे अचूक पद्धतीने होणे गरजेचे असून निवडणुकीत एक चूकही महागात पडू शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अचूक कामे करावीत, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अजित देशमुख निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांच्यासह प्रांताधिकारी व तहसीलदार यांची उपस्थिती होती.


मतदानासाठी नियुक्त झाल्यानंतर मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंतची सर्व जबाबदारी ही क्षेत्रीय अधिकारी यांच्यावर राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सूचनेनुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी काम करावे. तसेच मतदान घेण्याची कार्यपद्धती ही सांघिक स्वरूपाची असली तरी प्रत्येकाची जबाबदारी आयोगाने निश्चित केलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन व व्ही व्ही पॅट हाताळता यावे, यासाठी प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रात काही किरकोळ दुरुस्ती किंवा बिघाड झाल्यास अशावेळी नेमके काय करावे, याबाबतही प्रशिक्षणातून माहिती देण्यात आली. तसेच मतदान यंत्रासंदर्भात काही अडचणी किंवा शंका असल्यास त्याबाबत विचारणा करावी, शंका मनात ठेवून काम केल्यास अडचण निर्माण होईल, असे सांगत सर्व कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने प्रशिक्षण घ्यावे, अशा सूचना रामचंद्र शिंदे यांनी केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details