माढा (सोलापूर) - वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच डाॅक्टर वर्ग देखील आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या जोरावर शेती केल्यास ती निश्चितच फायद्याची ठरते. याचा प्रत्यय माढ्यातील डॉक्टरांनी कृतीतून दाखवून दिला आहे.
बातचित करताना डॉ. पंकज दोशी मोठ्या शहरातून आहे मोठी मागणी
डाॅ. पंकज रवींद्र दोशी, असे त्या डॉक्टराचे नाव आहे. त्यांनी दोन वर्षांपासून सुरू केलेला 'आर्कीड फुल' शेतीचा प्रयोग यशस्वीही ठरला आहे. ही ऑर्कीडची फुले हैदराबाद, दिल्ली, मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत दर महिन्याला जात आहेत. बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेल्या फुलांपैकी एक असलेले ऑर्कीड फुल मंदिर सजावट, लग्न समारंभ, असो की अन्य कार्यक्रम, सत्कारासाठी लागणारे बुके (पुष्पगुच्छ) यासाठी या फुलांना मोठी मागणी असते. क्वचितच ठिकाणी याची लागवड केली जाते. त्यामुळे दरही जास्त प्रमाणात मिळतो. मोठ्या शहरातून या फुलांना मोठी मागणी आहे.
दहा गुंठ्यात दहा हजारांहूंन अधीक रोपांची लागवड
जाधववाडी गावच्या शिवारात डाॅ. पंकज दोशी यांनी वडिलोपार्जित शेतीत पाॅलिहाऊस (हरितगृह) उभारणी करुन त्यात 2019 साली ऑर्कीड फुल शेती फुलवली आता ती बहरली आहे. 10 गुंठे क्षेत्रात जवळपास 10 हजारांहून अधिक ऑर्कीड फुलांची रोपे या पाॅलीहाऊसमध्ये ठेवलेली आहेत. जांभळा व पांढऱ्या कलरच्या ऑर्कीडच्या फुलांची येथे लागवड करण्यात आली असून याच फुलांना बाजारपेठेत अधीक मागणी आहे. विशेष म्हणजे डाॅक्टरांची ही ऑर्कीड फुल शेतीचा प्रयोग बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या चार जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून अन्य ठिकाणी आजच्या मितीलाही हा प्रयोग उभा झालेला नसल्याचे डॉक्टर दोशी बोलताना सांगतात.
काळजी व नियोजनामुळे प्रयोग झाला यशस्वी
डाॅ. दोशी हे थायलंड येथे फिरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना ऑर्कीडची फुले दिसली व ती आवडली. अशा फुलांची लागवड आपल्या शेतात करावी, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी दोन रोपे आणून शेतात एक व घरासमोर एक लावली. त्यानंतर डॉ. दोशी व त्यांचे इस्लामपूरचे मित्र डॉ. विकास व विक्रांत खोत यांनी पुण्यातील कुमार सी.के.एफ. प्लान्ट येथून ऑर्कीडची रोपे आणली. त्यानंतर त्यांनी पॉलीहाऊस (हरितगृह) रोपे लावली. त्या रोपांची विशेष काळजी व नियोजनामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
हेही वाचा -सोलापूर जिल्ह्यात मराठा आक्रोश मोर्चा.. अनेक ठिकाणी पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष