सोलापूर- करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील प्रसिद्ध कमलाभवानी मातेचा यात्रा महोत्सव शनिवारी हजारो लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी करमाळा शहरातील व जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित होते.
शनिवारी 16 नोव्हेंबरला मुख्य यात्रा महोत्सवानिमित्त रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी मुख्य यात्रेचा छबिना 5 देवतांची मिरवणूक निरनिराळ्या वाहनांवरून काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक पहाटे 3 वाजता खंडोबा मंदिरासमोर आल्यानंतर तिथे भवानी माता व खंडोबाचा भक्तिपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला. या छबीना मिरवणूकीची सांगता पहाटे साडेपाच वाजता करण्यात आली. यावेळी बापूराव पुजारी दादासाहेब पुजारी, विजय पुजारी, रामदास सोरटे, मनोहर सोरटे, नारायण सोरटे, तुकाराम सोरटे, योगेश सोरटे, विशाल सोरटे, दिलीप चव्हाण शामराव पुराणिक, रविराज पुराणिक, विश्वस्त मंडळ अध्यक्ष सोमनाथ चिवटे, विशाल राठोड उपस्थित होते.
हेही वाचा - सरपंचांच्या न्याय हक्कासाठी सरपंच परिषद न्यायालयात जाणार, सोलापूरच्या बैठकीत निर्णय