सोलापूर - कोरोनाबाधित रुग्णांची खोटी आकडेवारी प्रसिद्ध केल्यामुळे 'धसका' या यूट्यूब चॅनेलचा संपादक आणि मालक असलेल्या अक्षय बबलाद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपादकाने यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खोटी माहिती प्रसारित करून लोकांमध्ये भीती परसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
शुक्रवारी 'सोलापूरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत' अशी बातमी या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली होती. त्यात सोलापूरात आढळलेल्या कोरोना रूग्णांची खोटी आकडेवारी प्रसिदध करण्यात आली होती. या प्रकरणी सोलापूरातील धसका यूट्यूब चॅनेलच्या संपादक अक्षय बबलाद विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाजार पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.