महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Subramanian Swamy : सुब्रमण्यम स्वामींचे शिंदे-फडणवीस सरकारवर मोठे विधान, म्हणाले, ये सरकार तोडके बनायी....

महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारबाबत भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठे वक्तव्य ( Subramanian Swamy on Shinde Fadnavis government ) केले आहे. ते म्हणाले की, हे सरकार पाडून बनवले गेले आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार फोडून सरकार बनवले, हे बरोबर नाही. यामुळे हे अनैतिक सरकार आहे. ते पंढरपूर दौऱ्यावर ( BJP leader Subramanian Swamy in Pandharpur ) असताना त्यांनी हे विधान केले आहे.

By

Published : Dec 24, 2022, 11:03 PM IST

Subramanian Swamy
Subramanian Swamy

पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे नेते सुब्रमण्य स्वामी

सोलापूर (पंढरपूर) : भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात ( ( BJP leader Subramanian Swamy in Pandharpur ) ) दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भेटी दरम्यान विठ्ठल मंदिर परिसरमध्ये तयार करण्यात येणाऱ्या कॉरिडॉरला विरोध दर्शवला असून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधी भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी शिंदे फडवणीस सरकारबाबत मोठे वक्तव्य ( Subramanian Swamy on Shinde Fadnavis government ) केले आहे.

शिंदे फडणवीस सरकारवर मोठे वक्तव्य :माध्यमांशी बोलताना त्यांना महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार विषयी विचारले असता स्वामी म्हणाले, की हे सरकार पाडून बनवले गेले आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार फोडून सरकार बनवले, हे बरोबर नाही. यामुळे हे अनैतिक सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे भाजपच्याच नेत्यांनी भाजप सरकार विषयी असे वक्तव्य केल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

पंढरपूर कॉरिडॉरबाबत वक्तव्य :पंढरपूर कॉरिडॉविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘ पंढरपूरचे लोक मला मुंबईत येऊन भेटले होते. हा मोठा विषय आहे. कोर्टात सबडिसमिस झाला आहे. त्यानंतर मी त्यांच्याकडून कोर्टातील कागदपत्रं मागवली होती. यासंदर्भातली कागदपत्रं मी वाचली असून त्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे आलो आहे.पंढरपूर कोरिडोअरची गरज काय? इथे लोक वाहनांनी येत आहे.रस्ते खराब आहे.ते आधी करावे. पंढरपूर कॉरिडोअरची एवढी आवश्यकता का पडली? विमानतळ बनवा. लोक येतील त्यामुळे व्यवसाय वाढेल. त्यानंतर स्वत: पंढरपूर चांगले बनेल, असे त्यांनी सांगितले.

कॉरिडॉरसाठी विरोध :नव्या कॉरिडॉरसाठी मंदिरं तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी लोकांना नोटिसा आल्या आहेत. हे सरकार चुकीचं करत आहे. कोर्टात हे टिकणार नाही, असा इशारा स्वामी यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर कॉरिडोअरसाठी आग्रही आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा कॉरिडोअर होणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी त्याला विरोध केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details