महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करमाळा : कन्याकुमारी एक्सप्रेसला रेल्वेरुळावर दगड ठेवून अडवण्याचा प्रयत्न

मुंबईकडे जाणारी कन्याकुमारी-मुंबई एक्सप्रेस रेल्वेमार्गावर मोठे दगड ठेवून गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाशिंबे स्टेशन मास्तरांनी हा प्रकार पोफळज स्थानकाला कळवला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे मार्गावरील दगड बाजूला केले.

कन्याकुमारी-मुंबई एक्सप्रेस

By

Published : Oct 18, 2019, 10:01 AM IST

Updated : Oct 18, 2019, 12:21 PM IST

सोलापूर - मुंबईकडे जाणारी कन्याकुमारी-मुंबई एक्सप्रेस रेल्वेमार्गावर मोठे दगड ठेवून गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोपळज वाशिंबे (ता.करमाळा) दरम्यान दगडांना धडकून रेल्वे पूढे गेली.

रेल्वे दगडांना धडकल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी वाशिंबे स्टेशन मास्तरांना याची कल्पना दिली. वाशिंबे स्टेशन मास्तरांनी हा प्रकार पोफळज स्थानकाला कळवला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे मार्गावरील दगड बाजूला केले. यादरम्यान कन्याकुमारी एक्सप्रेस रात्रीच्या अंधारात सुमारे ४५ मिनिटे वाशिंबे स्थानकावर उभी होती.

हेही वाचा - सावरकरांचा दुसरा चेहरा बघता त्यांना भारतरत्न देणे चुकीचे'

रेल्वे मार्ग सुरळीत झाल्यानंतर ही रेल्वे अतिशय कमी वेगाने पुढे मार्गस्थ झाली. कुर्डूवाडी रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली. अज्ञातांविरुद्ध करमाळा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी देखाल या भागात रेल्वे रुळावर सिमेंटचे स्लीपर ठेवून रेल्वे लुटण्याचा प्रयत्न झालेला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Last Updated : Oct 18, 2019, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details