सोलापूर - आपल्या निष्काळजीपणामुळे सोलापूरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 12 एप्रिलला सोलापुरात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्ण संख्या वाढतच गेली आहे. जवळपास 5 हजार रुग्ण सोलापूर जिल्हा व शहरात झाले आहेत. ग्रामीण भागात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत.
कोरोनावर आजतागायत लस आली नाही. यामुळे एकमेव पर्याय म्हणून लॉकडाऊन लावण्याची वेळ सोलापूरच्या प्रशासनावर आली आहे. 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापुरात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला असून, त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती शहर व ग्रामीण पोलीस प्रमुखांनी दिली आहे. सोलापूर पोलीस आयुक्तांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे संगितले आहे की, शहरातील जनतेने लॉकडाऊन कटाक्षपणे पाळले पाहिजे. विनाकारण बाहेर न येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.