महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर : बँकेच्या कॅश काउंटरवरुन ९ लाखांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

बँकेत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे लक्ष वळवण्यासाठी एकजण दुसऱ्या बाजूने उभा राहिला आणि त्याने दुसरीकडे लक्ष वेधून घेतले. त्याच दरम्यान चोरट्यांनी टेबलावर ठेवलेली बॅग पळविली.

By

Published : Apr 3, 2019, 10:40 AM IST

संग्रहित छायाचित्र

सोलापूर - पंढरपुरातल्या स्टेट बँकेतून ९ लाखांची रोकड पळवल्याची घटना घडली. ही घटना बँकेमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे आरोपींचा तपास लवकरच करता येणार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मंगळवारी स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेत नेहमीच्या तुलनेत जास्त गर्दी होती. त्याचवेळी सी.एम.एस. या कंपनीचा कर्मचारी सौरभ सतीश हेंद्रे हा ९ लाखांची रक्कम घेऊन स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतील कॅश काउंटरवर उभा होता. त्यावेळी ३ ते ४ तरुणांनी रोकड घेऊन उभ्या असलेल्या सौरभ हेंद्रे याला घेरले आणि त्याचे लक्ष विचलित केले. त्याचवेळी बँकेत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे लक्ष वळवण्यासाठी एकजण दुसऱ्या बाजूने उभा राहिला आणि त्याने दुसरीकडे लक्ष वेधून घेतले. त्याच दरम्यान चोरट्यांनी टेबलावर ठेवलेली बॅग पळविली. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यात चोरटे दिसून आले. याप्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details