सोलापूर -सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 1 हजार 537 पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. तर, 1 हजार 327 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असताना सोलापुरातील रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. तर, मृतांची संख्या देखील आज 40 आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने सोलापुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कारण, कडक लॉकडाऊन आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे सोलापुरातील सर्व व्यवहार ठप्प आहेत.
हेही वाचा -सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज वाढले 1320 रुग्ण
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 1 हजार 320 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 825 पुरुष आणि 495 स्त्रियांचा समावेश आहे. 20 पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 8 पुरुष व 12 स्त्रिया आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सर्वाधिक रुग्ण पंढरपूर (299 रुग्ण) येथे वाढले आहेत. माळशिरस (245), मंगळवेढा (146), माढा (147), बार्शी (101), करमाळा (123) या तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत.
सोलापूर शहरात वाढले 217 रुग्ण
सोलापूर शहरात कोरोना महामारी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना राबवित टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट यावर अधिक भर दिला आहे. पण, त्यात देखील कोरोना रुग्णसंख्य वाढतच चालली आहे. सोलापूर शहरात आज दिवसभरात 217 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये 112 पुरुष, तर 105 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात आज उपचार घेत असलेल्या 20 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 16 पुरुष व 4 स्त्रिया आहेत. कोरोना रुग्ण वाढत चालल्याने सोलापुरात पोलीस व आरोग्य प्रशासन कोरोना विषाणूची महामारी रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र, कोरोना विषाणूचे थैमान थांबत नाही.
सोलापुरातील 1327 रुग्ण बरे
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणू किंवा कोरोना आजारावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ही बाब समाधानकारक आहे. सोलापूर शहरातील 436 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, जिल्ह्यातील ग्रामीण भागात किंवा विविध तालुक्यांत 891 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा -पंढरपूर येथे मल्टिप्लेक्स थिएटर बंद करून युवा उद्योजकाने उभारले कोविड रूग्णालय