सोलापूर -माढा तालुक्यातील वडशिंगे गावची विविध सेवा सहकारी संस्था अर्थात सोसायटीच्या बिनविरोध निवडणुकीची १९४४ पासूनची परंपरा ७८ वर्षांनी अखेर खंडीत झाली असून प्रथमच निवडणुक लागली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या रामसिध्द विकास पॅनलला १३ पैकी १३ जागी सभासदांनी पंसती दिली आहे. तर ग्रामपंचायतीत सत्ताधारी असलेल्या यंग ब्रिगेडला अर्थात स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला सभासदांनी नाकारले आहे.
Society Election Vadshinge : वडशिंगे सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचा 'झेंडा'
१९४४ साली वडशिंगे सोसायटीची स्थापना झाली होती. आतापर्यंत ७८ वर्षात १५ निवडणुका झाल्या त्याही बिनविरोध मात्र यंदाच्या वर्षी १६ वी निवडणुक लागली आणि ती परंपरा खंडीत झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन पक्षाच्या नेते मंडळीनी एकत्रित येऊन रामसिध्द विकास पॅनल उभा केला होता. १३ पैकी १३ जागा पटकावताच रामसिध्द पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व हलगीनाद करत गावात मोठा जल्लोष साजरा केला.
भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी १९४४ साली वडशिंगे सोसायटीची स्थापना झाली होती. आतापर्यंत ७८ वर्षात १५ निवडणुका झाल्या त्याही बिनविरोध मात्र यंदाच्या वर्षी १६ वी निवडणुक लागली आणि ती परंपरा खंडीत झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन पक्षाच्या नेते मंडळीनी एकत्रित येऊन रामसिध्द विकास पॅनल उभा केला होता. १३ पैकी १३ जागा पटकावताच रामसिध्द पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व हलगीनाद करत गावात मोठा जल्लोष साजरा केला. वयोवृद्ध मंडळीनी देखील हालगीवर ठेका धरला होता.
हेही वाचा -VIDEO :'...अन्यथा मनसैनिकांच्या लोंढ्यात चिरडून जाल'; मनसेचा भीम आर्मीला इशारा