महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 100 बेडचे कोविड सेंटर सुरू

शुक्रवारी बाजार समितीमधील कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पणन संचालक सोनी यांनी ऑनलाइनद्वारे या कोविड सेंटरचे उद्घाटन केले. 3 डॉक्टर्स, 10 नर्स आणि 5 आरोग्य कर्मचारी हे रुग्णांच्या सेवेसाठी राहणार असल्याचे चेअरमन रणवीर राऊत यांनी सांगितले आहे. शिवाय सेवा बजावत असताना येथील सामाजिक संस्थांचा मोठा आधार मिळाला असल्याचे प्रांताधिकारी निकम यांनी स्पष्ट केले आहे.

कोविड सेंटर बार्शी
कोविड सेंटर बार्शी

By

Published : May 15, 2021, 7:46 PM IST

बार्शी (सोलापूर) - बार्शीच्या आरोग्य यंत्रणेवर केवळ तालुकाच नव्हे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 8 तालुक्यातील रुग्णांचा कल आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये. तसेच रुग्णांबरोबर रुग्ण नातेवाईकांची सोय येथील सामाजिक संस्थांनी केली आहे. शुक्रवारी (आज) कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. 750पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर तालुक्यात 13 कोविड सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिकची आहे. बार्शी हे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. शिवाय याठिकाणी वैद्यकीयदृष्ट्या सुविधा असल्याने रुग्णांचा कल बार्शीकडेच राहिलेला आहे. त्यामुळे याठिकाणी तब्बल 13 कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्ण वाढत असले तरी त्यांच्या सेवेत बार्शीकर तत्पर असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे. शुक्रवारी बाजार समितीमधील कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पणन संचालक सोनी यांनी ऑनलाइनद्वारे या कोविड सेंटरचे उद्घाटन केले. 3 डॉक्टर्स, 10 नर्स आणि 5 आरोग्य कर्मचारी हे रुग्णांच्या सेवेसाठी राहणार असल्याचे चेअरमन रणवीर राऊत यांनी सांगितले आहे. शिवाय सेवा बजावत असताना येथील सामाजिक संस्थांचा मोठा आधार मिळाला असल्याचे प्रांताधिकारी निकम यांनी स्पष्ट केले आहे. बाजार समितीमधील कोविड सेंटरचा आधार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती ऑक्सिजनचा पुरवठा केला, याची माहिती जाहीर करावी - अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details