सिंधुदुर्ग- कणकवली तालुक्यात फोंडाघाट बावीचे भाटले येथे दोन गटात जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यादरम्यान, दोन्ही गटातील ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्नालयात उपचार सुरु आहेत. कणकवली पोलिसांत याप्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जमिनीच्या वादातून हाणामारी होण्याची गेल्या १५ दिवसांतली ही दुसरी घटना आहे.
पारकर व कातरुड कुटुंबात जमिनीवरून वाद -
फोंडाघाट बावीचे भाटले येथे पारकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीवरून वाद आहेत. या वादामुळे सायंकाळी पारकर यांच्या कुटुंबातील लोकांनी कातरुड हे राहत असलेल्या घरी जात वाद केला. त्यात दोन्ही कुटुंबात लाकडी दांडा व अन्य साहित्याच्या सहायाने तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे.
जखमींना उपचारासाठी केले दाखल -