सिंधुदुर्ग - ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कारमळकर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. अभ्यास करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणतात.. ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम महत्वाची, परंतु..
ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कारमळकर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. अभ्यास करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम महत्वाची
कणकवली येथे ते बोलत होते. ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीमसाठी इंटरनेट नेटवर्कची जी कनेक्टिव्हिटी लागते ती येथील भौगोलिक परिस्थितीमुळे मिळणे शक्य नाही. शहरात कनेक्टिव्हिटी मिळेल, मात्र ग्रामीण भागातील मुलांनी काय करावे, हा प्रश्न आहे. यावर आम्ही विचार करत आहोत. परंतु, येणाऱ्या काळात आपल्याला ऑनलाइन एज्युकेशन सिस्टीम तयार करावीच लागेल, असेही सामंत यावेळी म्हणाले.