महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने घटप्रभा नदीला पूर, पापडी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

चौकुळ परिसरात रात्री पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील घटप्रभा नदीला पूर आला आहे. परिणामी आंबोली आणि चौकुळ गावाला जोडणारा पापडी पुल पाण्याखाली गेला आहे.

By

Published : Jul 29, 2019, 11:44 AM IST

मुसळधार पावसाने आंबोलीत घटप्रभा नदीला पूर

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे घटप्रभा नदीला पूर आला आहे. परिणामी आंबोली आणि चौकुळ गावाला जोडणारा पापडी पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

रात्रीपासुन पावसाची जोरदार बॅटींग चालू आहे. त्यामुळे नदी, नाले ओसांडून वाहत आहेत. रस्त्यावर देखील पाणी साचले आहे. पापडी पुल मार्गावरील एसटी बसेस व अनेक वाहने पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडली आहेत. यामुळे प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. अजूनही या पुलावर दोन ते तीन फुटांवर पाणी आहे. हे पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details