महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी

जिल्ह्यात येत्या वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा रुग्णालयालगतची जागा आरोग्य शिक्षण विभागाकडे वर्ग केल्यानंतर तातडीने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.

Medical College sanctioned i
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल काॅलेजला मंजूरी

By

Published : Jul 4, 2020, 11:45 AM IST

Updated : Jul 4, 2020, 1:12 PM IST

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हा मुख्यालयातील जिल्हा रुग्णालयाच्या लगतची जागा आरोग्य शिक्षण विभागाकडे तातडीने वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. वर्षभरात प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न असतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात नुकतीच व्हिडिओ कॉन्फरसीव्दारे बैठक झाली. यात आरोग्य शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, आरोग्य खात्याचे उपसचिव, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्र, रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, "जिल्ह्यात येत्या वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा रुग्णालयालगतची जागा आरोग्य शिक्षण विभागाकडे वर्ग केल्यानंतर तातडीने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. याविषयीची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने करावी. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे अन्य मंजुऱ्या मिळण्यास अडचण नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रस्ताव आरोग्य व आरोग्य शिक्षण विभागास सादर करावेत. त्यास मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीमध्ये सादर करुन मंजुरी घेता येईल.

डॉ. लहाने म्हणाले, "वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार आहे. तांत्रिक बाबी, यंत्रसामुग्री खरेदी, मनुष्यबळ निर्मिती, या सर्वांचे प्रस्ताव तयार आहेत. जागेचा प्रश्‍न मार्गी लागणे बाकी आहे. आरोग्य शिक्षण विभागास जागा वर्ग केल्यानंतर तातडीने काम सुरू करता येईल..'' दरम्यान या निर्णयामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडणार आहे.

Last Updated : Jul 4, 2020, 1:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details