सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेली 38 गावे, तसेच 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 12 गावे, असे मिळून एकूण 50 गावांमध्ये प्रत्येकी 20 खाटांचे कोरोना काळजी केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून 1 हजार बेडची क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील 'एचआरसीटी' चाचण्यांच्या दरावर देखील निर्बंध आणले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सामंत यांच्या हस्ते आज 9 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील 50 गावांमध्ये कोरोना काळजी केंद्रे
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेली 38 गावे, तसेच 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 12 गावे, असे मिळून एकूण 50 गावांमध्ये प्रत्येकी 20 खाटांचे कोरोना काळजी केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या माध्यमातून 1 हजार बेडची क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
'एचआरसीटी'च्या चाचणीसाठी दर निश्चित - सामंत
'एचआरसीटी'च्या 16 स्लाईस चाचणीसाठी 2 हजार रुपये, 16 ते 64 स्लाईससाठी 2 हजार 500 रुपये आणि 64 स्लाईसच्या पुढे 3 हजार रुपये दर जिल्ह्यासाठी असणार आहेत. यापेक्षा अधिक दर कोणी आकारत असतील, तर संबंधितांची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे करावी. जादा दर आकारणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी उदय सामंत यांनी दिला आहे.