सिंधुदुर्ग- नाणारबाबत सामनामध्ये जाहिरात आली, म्हणजे शिवसेनेची भूमिका बदलली असे नाही. जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवू शकत नाही. नाणारच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधातील शिवसेनेची भूमिका कायम आहे. नाणार हा विषय आता बंद झाला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
'जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवू शकत नाहीत'
नाणारच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पा विरोधातील शिवसेनेची भूमिका कायम आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामनामधून नाणार समर्थनार्थ प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीबद्दल विचारले असता, जाहिरात आली म्हणून आमचे धोरण बदलले, असे होत नाही. शिवसेनेचे धोरण व निर्णय मी ठरवतो. ते सामनामधून मांडले जाते. कोणताही जाहीरातदार शिवसेनेचे धोरण बदलू शकत नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
- दलितांवर अन्याय होऊ देणार नाही -
एल्गार परिषद व कोरेगाव भीमा विषयावर बोलताना ठाकरे म्हणाले, दलितांवर आपण अन्याय होऊ देणार नाही. एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हे दोन वेगळे मुद्दे आहेत. एल्गारचा तपास केंद्राने काढून घेतला आहे. तर, कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे गेला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.