महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 7, 2022, 4:33 PM IST

ETV Bharat / state

Ganesh Festival : गणेश चतुर्थीसाठी सिंधुदुर्ग विभागास एसटीच्या जादा २०० गाड्या

गणेश उत्सव कालावधीसाठी एसटी महामंडळाने नियोजन ( MSRTC planning for Ganesh Utsav ) केले असून सिंधुदुर्ग विभागाला दोनशे जादा गाड्या (Additional 200 ST buses to Sindhudurg ) पुरविण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई, पुण्याहून जिल्ह्यात येण्यासाठी २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत ३४ जादा गाड्या बुकिंग झालेल्या आहेत. यंदा पुणे आणि मुंबई येथून जवळपास ३४ गाड्या बुकिंग झाल्या आहेत.

MSRTC planning for Ganesh Utsav
गणेश उत्सव कालावधीसाठी एसटी महामंडळाने नियोजन

सिंधुदुर्ग: गणेश उत्सव कालावधीसाठी एसटी महामंडळाने नियोजन ( MSRTC planning for Ganesh Utsav ) केले असून सिंधुदुर्ग विभागाला दोनशे जादा गाड्या (Additional 200 ST buses to Sindhudurg ) पुरविण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई, पुण्याहून जिल्ह्यात येण्यासाठी २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत ३४ जादा गाड्या बुकिंग झालेल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठीही एसटीने बुकिंगची सुविधा ( MSRTC Booking for Sindhudurg ) सुरू केली आहे.

गणेश चतुर्थीसाठी सिंधुदुर्ग विभागास एसटीच्या जादा २०० गाड्या

कोकणातील चाकरमान्यांसाठी विशेष सोय -येत्या ३० तारखेस हरितालिका आणि ३१ रोजी गणेश चतुर्थी आहे. यासाठी वेगवेगळ्या मार्गाने मुंबई, पुण्याचे चाकरमानी कोकणात येत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमाण्याची संख्या लक्षणीय आहे. यंदा पुणे आणि मुंबई येथून जवळपास ३४ गाड्या बुकिंग झाल्या आहेत. या गाड्या २५ ते ३१ ऑगस्टला जिल्ह्याच्या विविध आगारांमध्ये दाखल होणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी दोन सप्टेंबरपासून जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील आठही आगारातून पुणे, निगडी, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, बोरिवली, कल्याण, भांडुप, कुर्ला नेहरूनगर, परळ, मुंबई सेंटर, दादर अशा विविध स्थानावर या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठी चार ते ११ सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक एसटी बुकिंग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ग्रुप बुकिंगही केले जाणार असल्याची माहिती एसटीच्या सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-MNS Vs Governor Koshyari : 'कोश्यारींनी पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेची कुवत...'; राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मनसेचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details