महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Narayan Rane Bungalow Action Order : नारायण राणेंच्या मालवनमधील बंगल्यावर कारवाईचे आदेश; अद्याप कारवाई नाही!

केंद्रिय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांच्या मालवणमधील नीलरत्न या बंगल्यावर सोमवारी कोणतीही कारवाई केली गेली नाही. दरम्यान सध्या बंगल्याचे दुरुस्तीचे काम जोरदार सुरू आहे. मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र या बंगल्यावरील कारवाईच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे.

Action Order on Narayan Rane nilratna Bungalow
नारायण राणेंचा नीलरत्न बंगला

By

Published : Feb 22, 2022, 5:09 PM IST

Updated : Feb 22, 2022, 5:59 PM IST

सिंधुदुर्ग - केंद्रिय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांच्या मालवणमधील नीलरत्न या बंगल्यावर सोमवारी कोणतीही कारवाई केली ( Action Order on Narayan Rane Nilratna Bungalow ) गेली नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश ( Narayan Rane Bungalow Action Order ) देण्यात आले आहेत. अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

प्रतिनिधीने घेतलेला आढावा

दरम्यान सध्या बंगल्याचे दुरुस्तीचे काम जोरदार सुरू आहे. मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र या बंगल्यावरील कारवाईच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार नितेश राणे यांनी देखील आपल्याला या बंगल्याबाबत कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही असे सांगितले. तर प्रशासकीय पातळीवर देखील कोणत्याही सूचना अद्याप मिळाल्या नसल्याचे जिल्हा प्रशासनातील आधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

राणेंच्या मालवनमधील बंगल्यावर कारवाईचे आदेश -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना निलरत्न बंगल्याला ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणात राजकीय वातावरण तापले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले -

भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एनवायरनमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर ( Ministry of Environment Forest and Climate Change Nagpur ) कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला हे आदेश दिले आहेत. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मुख्यमंत्री आणि मातोश्रीवर टीका केली होती. या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई आदेश -

एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणे यांच्या मालवण येथील निलरत्न बंगला बांधताना सीआरझेड २ चे उल्लंघन झाले. अशी तक्रार ऑगस्ट २०२१ ला केली होती. त्यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात वातावरण तापले -

दरम्यान, सोमवारी राणे यांच्या मुंबईतील अदिश बंगल्याची मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने पाहणी केली. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण चिवला बीच येथील बंगल्याची मात्र कोणत्याही पथकाकडून पाहणी अथवा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सोमवारी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मालवण दौऱ्यावर आले होते. यावेळी या बंगल्यावरील कारवाई संदर्भात कोणतेही भाष्य करायला त्यांनी नकार दिला. मात्र जिल्ह्यात राजकीय वातावरण या बंगल्यावरील कारवाईच्या निमित्ताने चांगलेच तापले आहे.

हेही वाचा -MH Government Employees Strike : राज्य सरकारचे कर्मचारी उद्यापासून संपावर; 'या' आहेत मागण्या

Last Updated : Feb 22, 2022, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details