महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' जेसीबीचालकाचा बुडून मृत्यू, आठ तासांनी सापडला मृतदेह

पाइपलाइनचे काम करण्यासाठी आलेल्या जेसीबीचालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. सकाळी दोन जेसीबी, एक पोकलेन व क्रेनने पडलेले जेसीबी मशीन बाहेर काढले होते. मात्र वैभवचा तपास लागला नाही. अखेर विहिरीतील पाणी मोटारीने उपसल्यानंतर तळाशी वैभवचा मृतदेह आढळून आला.

Dead
विहिरीत पडलेली जेसीबी

By

Published : May 20, 2020, 8:53 PM IST

सातारा- माण तालुक्यातील बिदल येथे पाइपलाइनचे काम करण्यासाठी आलेल्या जेसीबी चालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वैभव मुळीक (वय 25 ) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. वैभव सकाळी विहिरीमध्ये जेसीबीसह पडला होता. तब्बल 8 तासांनी त्याचा मृतदेह विहिरीच्या तळात सापडला आहे.

विनायक जगदाळे यांच्या विहिरीवर पाइपलाइनचे काम सुरू आहे. या कामासाठी बिदल येथे वैभव भरत मुळीक जेसीबी मशीनसह तिथे काम करत होता. विनायक जगदाळे हे कुठून कशी पाइपलाइन न्यायची यासाठी फक्की टाकत होते. तर वैभवने जेसीबीने विहिरीलगतची जागा साफ करण्यास सुरुवात केली. मात्र साफसफाई करत असताना वैभवचे जेसीबी मशीनवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मातीवरुन जेसीबी मशीन घसरून वैभव मशीनसह थेट विहिरीतील पाण्यात पडला.

सकाळी दोन जेसीबी, एक पोकलेन व क्रेनने पडलेले जेसीबी मशीन बाहेर काढले होते. मात्र वैभवचा तपास लागला नाही. काही वेळात विहिरीमधील पाणी मोटारीने काढण्यात आल्यानंतर चार वाजता वैभवचा मृतदेह विहिरीच्या तळामध्ये सापडला. या घटनेमुळे पूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details