सातारा - इतकी वर्षे सत्तेत असूनही आमच्या अधीच्या पिढीने मराठा समाजाला का न्याय दिला नाही. लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे उत्तर द्या. असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी साता-यात पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी खा. शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवार म्हणत असतील की संभाजीराजे व उदयनराजे यांनी मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा तर करा संभाजीराजेंना मुख्यमंत्री ते सोडवतील, असे ते म्हणाले.
४०-५९ वर्षे राजकीय नेतृत्व करणा-या व मराठा समाजाचे नेतृत्व म्हणुन ओळखल्या जाणारांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर इतकी वर्षे काय केले. मंडल आयोग शिफारशी लागू करण्याच्यावेळी सत्ताधा-यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा का सोडवला नाही, असे प्रश्न उपस्थित करत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता घाणाघाती टिका केली.
भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांची सातारामध्ये पत्रकार परिषद मराठा समाजाला दाबण्याचे कामउदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेता, सर्वधर्म समभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचे गेली अनेक वर्षे झाले. मी मराठा समाजात जन्मलो तरी त्या समाजाचा म्हणून आज बोलत नाही. मराठा समाजावरील अन्यायाचा प्रश्न आमची पिढी आजवर सत्तेत आलेल्या मागील पिढीला विचारत आहे. त्यांनी केवळ राजकारणासाठी हा प्रश्न भिजत ठेवला. आजही तेच सत्तेत आहेत. त्यांना प्रश्नाची सखोल जाण आहे. मात्र त्यांना प्रश्न भिजत ठेवण्यात अधिक रस आहे. समाजातील लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला तर लोक तुम्हांला रस्त्यावर फिरु देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
टीकेचा रोख पवारांकडेसत्तेतील लोकांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला आहे. आणखी किती दिवस मराठा समाजाचा अंत बघणार आहात. पुढची पिढी आपल्याला जाब विचारेल. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अगोदरच्या पिढीने सोडवला पाहिजे. मंडल आयोगाच्यावेळी सत्तेवरील लोकांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती. ती का घेतली नाही याचा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही उदयनराजे यांनी केली. आता तुमचीच सत्ता आहे. न्यायालयाच्या तारखेवेळी तुम्ही वकील गायब करता. जातीचं राजकारण करायचं असेल तर अशांनी राजीनामा देऊन घरात बसावं, असेही उदयनराजे म्हणाले.
तर संभाजीराजेंना मुख्यमंत्री कराशरद पवार म्हणत असतील की छत्रपती संभाजीराजे व उदयनराजे यांनी मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा तर करा संभाजीराजेंना मुख्यमंत्री ते सोडवतील प्रश्न, असेही उदयनराजे भोसले एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना म्हणाले. राज्यातील सत्ता मिळणारच आहे. देवेंद्र फडणवीसांकडे सत्ता द्या मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.