महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wai Massacre Satara: वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला एका वर्षासाठी जामीन मंजूर

सातारा जिल्ह्यासह देशभरात गाजलेल्या वाई Wai Massacre Satara येथील ६ जणांच्या हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला एक वर्षासाठी जामीन मंजूर Jyoti Mandhare granted bail झाला आहे. बोगस डॉ. संतोष पोळ याने केलेल्या हत्याकांडाच्या Dr Santosh Pol massacre खटल्यातील ती माफीची साक्षीदार आहे. वैद्यकीय उपचारासाठी तिने जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अटी-शर्तीवर तिचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

Wai Massacre Satara
Wai Massacre Satara

By

Published : Sep 30, 2022, 2:28 PM IST

सातारा : सातारा जिल्ह्यासह देशभरात गाजलेल्या वाई Wai Massacre Satara येथील ६ जणांच्या हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला एक वर्षासाठी जामीन मंजूर Jyoti Mandhare granted bail झाला आहे. बोगस डॉ. संतोष पोळ याने केलेल्या हत्याकांडाच्या Dr Santosh Pol massacre खटल्यातील ती माफीची साक्षीदार आहे. वैद्यकीय उपचारासाठी तिने जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अटी-शर्तीवर तिचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.


खून करून मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरले :बोगस डॉ. संतोष पोळ याने ६ जणांची हत्या करून ते मृतदेह त्याच्या फार्म हाऊसमध्ये पुरले होते. यातील एका खुनात ज्योती मांढरे हिचा सहभाग आढळला होता. त्यामुळे हत्याकांडाच्या खटल्यात तिला संशयित आरोपी करण्यात आले होते. नंतर ती माफीची साक्षीदार झाली. गेल्या सहा वर्षांपासून ती कारावासात आहे. वैद्यकीय उपचारासाठी तिला जामीन मंजूर झाल्यामुळे वर्षभरासाठी ती कारागृहाबाहेर येणार आहे.


सहा वर्षांपूर्वी हत्याकांड उजेडात आले :सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 2016 मध्ये हे हत्याकांड उजेडात आणले होते. या हत्याकांडाच्या मालिकेमुळे वाईसह सातारा जिल्हा हादरून गेला होता. सातारा जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुरू आहे. वैद्यकीय उपचारासाठी जामीन मिळावा, असा अर्ज ज्योती मांढरेच्यावतीने न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालयाने अटी-शर्तीवर जामीन अर्ज मंजूर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details