सातारा- तडीपार असतानाही कराड शहरात खुलेआम फिरणार्या दोन गुंडांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. प्रतिक विजय साठे आणि बजरंग उर्फ बज्या सुरेश माने (रा. बुधवार पेठ, कराड), अशी अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडांची नावे आहेत. त्यांना सहा महिन्यांसाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा आणि कडेगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते.
कराडमध्ये खुलेआम फिरणाऱ्या दोन तडीपार गुंडांना सातारा एलसीबीने ठोकल्या बेड्या
तडीपार असतानाही कराड शहरात खुलेआम फिरणार्या दोन गुंडांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. प्रतिक विजय साठे आणि बजरंग उर्फ बज्या सुरेश माने (रा. बुधवार पेठ, कराड), अशी अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडांची नावे आहेत. त्यांना सहा महिन्यांसाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा आणि कडेगाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते.
सहा महिन्यासाठी करण्यात आले होते तडीपार- प्रतिक विजय साठे आणि बजरंग उर्फ बज्या सुरेश माने (रा. बुधवार पेठ, कराड) यांना सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा आणि कडेगाव तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश प्राधिकरणाने दि. 19 एप्रिल रोजी दिला होता. तरीही दोन्ही गुंड कराड बसस्थानक परिसरात खुलेआम फिरत होते. स्थानिक गुन्हे शाखेला याबाबतची माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने रात्री उशीरा त्यांना कराड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेऊन कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदरशाखाली हवालदार साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, अमोल माने, मुनीर मुल्ला, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, प्रवीण पवार, केतन शिंदे, गणेश कचरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही -Flood And Land Sliding At Satara: साताऱ्यातील ८१ गावांना यंदाही पूर, दरड आणि भूस्खलनाचा धोका