सातारा - सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी व भुस्खलनामुळे 416 गावे बाधित तर, 42 जण मृत आणि 6 जण बेपत्ता झाले आहेत. त्यांना शासनाकडून मदत मिळणार आहे. तथापि, अशा डेंजर झोनमध्ये राहणार्या लोकांचे सुरक्षीत ठिकाणी पुनवर्सन करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
डेंजर झोनमधील लोकांचे शासनाने सुरक्षितशस्थळी पुनर्वसन करावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 'पुनवर्सनाची गरज'
सातारा जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. यातील वाई तालुक्यातील कोंढावळेतील देवरुखवाडी तसेच जांभळी येथे रामदास आठवले यांनी भेट देवून नुकसानीची पाहणी केली. ज्या डोंगर पहाडांचा आधार घेवून पिढ्यान्-पिढ्या लोकांनी वस्ती केली, त्याच ठिकाणी जोरदार पावसामुळे त्यांचा घात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील 416 गावे बाधित झाली असून, 42 जणांचा मृत्यू झाला, तर 6 जण बेपत्ता झाले आहेत. त्यांना शासनाकडून मदत मिळणार असली, तरी डेंजर झोनमधील लोकांचे शासनाने सुरक्षित पुनर्वसन करण्याची गरज आहे. असेही आठवले म्हणाले आहेत.
'समिती नेमावी'
संपूर्ण महाराष्ट्रातील डेंजर झोनमध्ये राहणार्या लोकांचे सुरक्षित ठिकाणी पुनवर्सन करण्यासाठी समिती नेमावी, धरणग्रस्तांना पाणी मिळाले पाहिजे त्यासाठी शासनाने व्यवस्था करावी. नदीवर धरण प्रकल्प व्हावेत, धरणे बांधली जावीत, त्यातून पाण्याचा तसेच विजेचा प्रश्न सुटेल, अशी भुमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पं. नेहरूंच्या मंत्रीमंडळात मांडली होती. धरणे बांधण्यात आली आहेत, परंतु, धरणांमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनाही पाणी मिळाले पाहिजे. असेही आठवले म्हणाले आहेत.
'पाणी मात्र बारामतीला'
खंडाळ्यातील लोकांच्या जमिनी धोम-बलकवडी धरणात गेल्या मात्र, पाणी बारामतीला जात असून खंडाळ्यातील लोक वंचित असल्याची माहिती मला मिळीली आहे. बारामतीला पाणी मिळाले पाहिजे, परंतु, खंडाळ्यातील जनतेलाही ते मिळावे. अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली आहे. मला राज्यमंत्री पद मिळाले असले, तरी ते संपूर्ण देशाचे राज्यमंत्रीपद आहे. यामध्ये मी समाधानी आहे असेही आठवले म्हणाले आहेत.