महाराष्ट्र

maharashtra

10th Standard Student Death : दहावीच्या विद्यार्थिनीचा अकस्मात मृत्यू, दिले होते दोन पेपर

कराडमधील एसएमएस इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकणार्‍या स्नेहा डुबल विद्यार्थिनीचा अकस्मात मृत्यू ( karad 10th class student death ) झाला आहे. स्नेहाने दहावीचे दोन पेपरही दिले होते. पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू ( Satara 10th Standard Student Death ) झाला.

By

Published : Mar 23, 2022, 2:51 PM IST

Published : Mar 23, 2022, 2:51 PM IST

10th Standard Student Death
स्नेहा डुबल

कराड (सातारा) - कराडमधील एसएमएस इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा अकस्मात मृत्यू ( karad 10th class student death ) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्नेहा डुबल असे तिचे नाव आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून स्नेहाने दोन पेपरही दिले होते. पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू ( Satara 10th Standard Student Death ) झाला. तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्नेहा डुबल

पोट दुखीमुळे सुरू होते उपचार -स्नेहा डुबल ही कराडमधील रूक्मिणीनगरमध्ये राहत होती. ती एसएमएस इंक्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होती. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून तिने दोन पेपरही दिले होते. तिला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्याने कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शैक्षणिक वर्तुळात शोककळा -दहावीतील विद्यार्थिनीच्या धक्कादायक मृत्यूमुळे कराडच्या शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थीनीचा पोट दुखीचे निमित्त होऊन मृत्यू झाल्याने शाळेच्या प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. स्नेहाच्या कुटुंबाला देखील जबर मानसिक धक्का बसला आहे. स्नेहा ही शाळेत हुशार होती. शाळेतील प्रत्येक उपक्रमात हिरिरीने सहभागी व्हायची. तिच्या मृत्यूमुळे वर्गमैत्रिणींनाही धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच स्कूल प्रशासन, शिक्षक आणि डुबल कुटुंबाच्या मित्र परिवाराने तिच्या घराकडे धाव घेतली होती.

हेही वाचा -Babanrao Lonikar : मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्प सरकारने गुंडाळला - बबनराव लोणीकर

ABOUT THE AUTHOR

...view details