महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 17, 2020, 3:29 PM IST

ETV Bharat / state

देगांव-निगडी एमआयडीसीचा मॅग्नेटिक महाराष्ट्र योजनेत समावेश करावा; शिवेंद्रसिंहराजेंची मागणी

देगांव-निगडी येथील नवीन एमआयडीसीचा मॅग्नेटिक महाराष्ट्र योजनेत समावेश करावा, अशी मागणी सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. देगांव-निगडीतील एमआयडीसीमध्ये छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यास वाव असल्याचे त्यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

shivendrasinhraje bhonsle
शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा - राज्याच्या उद्योग विभागामार्फत 'मॅग्नेटिक महाराष्ट्र-२.०' (भाग दोन) या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. रोजगारनिर्मीतीसाठी या योजनेत सातारा औद्योगिक वसाहतीमधील देगांव-निगडी या नवीन एमआयडीसीचा समावेश करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे.

राज्य सरकारमार्फत मॅग्नेटिक महराष्ट्र २.० या योजनेचा नुकताच शुभारंभ झाला. सातारा शहरालगत देगांव-निगडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर असून योग्य मोबदला मिळाला तर शेतकरीही जमीन देण्यास तयार आहेत. त्यामुळे या नवीन एमआयडीसीचा समावेश मॅग्नेटिक महराष्ट्र २.० या योजनेत करावा आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करावी. या ठिकाणी छोटे- मोठे उद्योगधंदे उभारण्यास मोठा वाव आहे, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे.

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी, कामगारांविना बंद पडलेल्या कंपन्या पूर्ववत सुरु होण्यासाठी आणि अर्थव्यवस्था कोलमडल्याने बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या उद्योगधंद्यांना उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी सातारा येथील देगांव-निगडी एमआयडीसी अनुकूल आहे. त्यामुळे मॅग्नेटिक महाराष्ट्र या योजनेत सातारा येथील या एमआयडीसीचा समावेश करावा. या नवीन एमआयडीसीमध्ये छोटे- मोठे उद्योगधंदे, कंपन्या सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details