महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातार्‍यातील तरुण केळवली धबधब्यात बुडाला, रेस्क्यू टीमकडून शोध सुरू

सातारा शहरातील विकासनगरमध्ये राहणारा तरूण केळवली येथील धबधब्यात बुडाला आहे. या तरूणाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

By

Published : Jul 24, 2022, 8:54 AM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

सातारा - सातारा शहरातील विकासनगरमध्ये राहणारा तरुण केळवली येथील धबधब्यात बुडाला आहे. या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून, रेस्क्यू टीमकडून बुडालेल्या तरुणाचा धबधब्यात शोध घेतला जात आहे.

हेही वाचा -Sex Racket in Karad :बांग्लादेशातून मुली आणून कराडमधील लॉजवर देहव्यापार, तेलंगणा पोलिसांच्या कारवाईने पर्दाफाश

पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला -सातार्‍यातील विकासनगरमधील रहिवासी राहुल सुभाष माने हा तरुण तीन मित्रांसह पर्यटनासाठी केळवलीला गेला होता. मित्रांसोबत तो पोहण्यासाठी केळवलीच्या धबधब्यात उतरला. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याला वाचवण्याचा मित्रांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सध्या रेस्क्यू टीमकडून बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू आहे.

पर्यटनस्थळी सुरक्षेचा अभाव -सध्या सातारा जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तरुण हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. पर्यटनस्थळी सुरक्षा उपायांचा अभाव असून वनविभाग आणि पोलिसांकडून पर्यटनस्थळावर गस्त वाढवण्याची आणि दिवसभर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा -Shambhuraj Desai : एकनाथ शिंदेच्या सुरक्षेबाबत शंभूराज देसाईचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंनी सुरक्षा वाढवण्यापासून रोखले

ABOUT THE AUTHOR

...view details