सातारा - लाॅकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या नागरिकांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या 1077 या हेल्पलाईनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज (रविवारी) अखेर 1 हजार 145 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार 1077 ही हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली होती.
सातारमध्ये हेल्पलाईनवर आले 1145 फोन; नागरिकांच्या तक्रारी सोडण्यात यश आल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा विश्वास
सातारा जिल्ह्यात हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांना सुविधेबरोबर अडचणी सोडविण्याचे काम केले जाते. आत्तापर्यंत सुमारे 1 हजार 145 लोकांचे फोन आले. त्यातील बहुतांश लोकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे.
हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांना सुविधेबरोबर अडचणी सोडविण्याचे काम केले जाते. आत्तापर्यंत सुमारे 1 हजार 145 लोकांचे फोन आले. त्यातील बहुतांश लोकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. 172 परप्रांतीयांनी, 167 जिल्ह्यातील नागरिकांनी, 49 जणांनी नोंदणी, 29 जणांनी औषधांसाठी, 253 वाहतुकीसंदर्भात पास मिळण्यासाठी, 351 रेशनकार्ड संदर्भात, 124 इतर असे एकूण 1 हजार 145 नागरिकांनी 1077 या हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे.
रेशन पुरवठ्याची नागरिकांना अद्यावत माहिती देणे. रेशनिंग संदर्भात तक्रारी नोंदवणे आणि त्याचे निराकरण करणे. रेशन दुकानदार फसवणूकीच्या तक्रारी नोंदविणे आणि संबंधित अधिकाऱ्याला कळविणे. परराज्यातील कामगार , ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे आदीबाबत विविध सुविधा 1077 या हेल्पलाईनद्वारे पुरविण्यात येतात.
समुपदेशनाचा राज्यातील पहिला उपक्रम -
कोरोना संदर्भात घाबरुन जावू नये, यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना मानसिक आधार आणि समुपदेशन देण्याची यंत्रणादेखील प्रशासनाने चालू केली आहे. फोन कॉलद्वारे राबविण्यास सुरुवात केली केली आहे. हा राज्यातील पहिला उपक्रम आहे. नागरिकांच्या काही तक्रारी व माहिती मिळण्यासाठी 1077 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.