कराड (सातारा) - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्यातून कोणाला बाहेर जाता येणार नाही. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यासंदर्भात आदेश जारी केला असून आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची सूचनाही प्रशासनाला केली आहे.
सातारा जिल्ह्याची नाकाबंदी, कोणालाही प्रवेश नाही; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्यातून कोणाला बाहेर जाता येणार नाही. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यासंदर्भात आदेश जारी केला असून आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची सूचनाही प्रशासनाला केली आहे.
सातारा जिल्ह्याची नाकाबंदी करण्यात आली असून आता कोणालाही प्रवेश देता येणार नाही. सोशल मीडियावर खोटे संदेश फिरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाने मुंबईतून येणाऱ्यांना कोणतीही मुभा दिलेली नाही. जिल्ह्यात येण्याचा वा जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.
प्रशासनाने अधोरेखित केलेल्या अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त कोणालाही घराच्या बाहेर पडता येणार नाही, असेही शेखर सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.