सातारा -जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडासंकुलात 78 बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, त्याची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी केली.
तत्पूर्वी प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपायोजना व रुग्णांवरील उपचारांबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख अधिका-यांच्या बैठकीत आढावा घेतला. बैठकीमध्ये ऑक्सिजन बेड तसेच आयसीयु बेड वाढवण्याच्या सूचना करून, पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या रेमडेसिवीरच्या साठ्याची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील 15 दिवस कडक निर्बंध घालते आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करा अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनला केल्या आहेत.या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.