सातारा - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जिल्ह्यातील लोणंद या गावामध्ये उद्या मुक्काम असणार आहे. तर तरडगाव, फलटन, बरड या ठिकाणीही पालखीचा मुक्काम असणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महनिरीक्षक सुहास वरके, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बंदोबस्ताची जय्यत तयारी केली आहे. तसेच पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन देखील सज्ज झाले आहे.
सातारा जिल्ह्यात उद्या पालखीचा पहिला मुक्काम, प्रशासन सज्ज
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जिल्ह्यातील लोणंद या गावामध्ये उद्या मुक्काम असणार आहे. तर तरडगाव, फलटन, बरड या ठिकाणीही पालखीचा मुक्काम असणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाली आहे.
सातारा जिल्ह्यात उद्या पालखीचा पहिला मुक्काम
पालखी काळात विविध मार्गावरील वाहतूकीमध्येही बदल करण्यात आले आहेत. तसेच चांदोबाचा लिंब येथे होणाऱ्या उभ्या रिंगणावेळी पर्यायी मार्गाचा वापर केला जाणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच साध्या वेशातील अधिकारी व कर्मचारी पथके कार्यरत असणार आहेत.
पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पाडेगावकडे जाणारी वाहतूक लोणंद येथील अहिल्यादेवी चौकातून बंद होणार आहे व पिंपरी बुद्रुक या बाजूने वाहतूक वळवली जाणार आहे.