महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विस्टाडोम कोचसह धावली नेरळ माथेरान मिनी ट्रेन

काचेच्या विस्तृत खिडक्या, पारदर्शक छत, आकर्षक रंग, नावीन्यपूर्ण अंतर्गत सजावट, आरामदायी आसनव्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, रंगबेरंगी एलईडी विद्युत दिवे, एलईडी टिव्ही स्क्रीन, नक्षीदार लाकडी फर्निचर अशा अनेक सुविधा या विस्टाडोममध्ये अंतर्भूत आहेत.

नेरळ माथेरान मिनी ट्रेन

By

Published : Feb 23, 2019, 3:52 PM IST

मुंबई- सेंट्रल रेल्वे हेरिटेज महिना साजरा करत आहे. या हेरिटेज महिन्याअंतर्गत नेरळ-माथेरान मिनी ट्रेन नव्या ढंगात पर्यटकांच्या भेटीला आली आहे. स्टीम लोको इंजिनसह पारदर्शक काच (विस्टाडोम) असलेल्याडब्याचे आज उद्घाटन झालेअसून मिनी ट्रेन हेरिटेज रन म्हणून चालविण्यात आली.

‘माथेरान क्वीन’ असे नाव असलेल्या या डब्याच्या बाहेरील बाजूस नैसर्गिक चित्रे लावण्यात आली आहेत. पक्षांच्या हालचालीची छायाचित्रे त्यावर चिकटवण्यात आल्यामुळे गाडीच्या वेगाबरोबर पक्षी स्पर्धा करतोय, की काय असा आभास निर्माण होत आहे. आजपासून जोडण्यात येणाऱ्या विस्टाडोम डब्यात अनेक अत्याधुनिक सोयी सुविधांचा समावेश आहे. विस्टाडोम कोचमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. पारदर्शक काचा असलेल्या मोठ्या खिडक्या हे या कोचचे वैशिष्ट्ये आहे. यामुळे प्रवाशांना घाट परिसरातील निसर्ग सौंदर्य न्याहाळता येईल. कोचच्या आतून सेल्फीसाठी विशेष जागामध्य रेल्वेच्या कुर्डूवाडी येथील कारखान्यात करण्यात आली आहे. या विस्टाडोम बोगीमध्ये एकूण ४० आसनाची व्यवस्था आहे. शिवाय बोगीच्या मागील बाजूस मोकळी जागा ठेवण्यात आली आहे.

नेरळ माथेरान मिनी ट्रेन

काचेच्या विस्तृत खिडक्या, पारदर्शक छत, आकर्षक रंग, नावीन्यपूर्ण अंतर्गत सजावट, आरामदायी आसनव्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, रंगबेरंगी एलईडी विद्युत दिवे, एलईडी टिव्ही स्क्रीन, नक्षीदार लाकडी फर्निचर अशा अनेक सुविधा या विस्टाडोममध्ये अंतर्भूत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details