सातारा- संजय शिंदेंना दहा दिवसांनी दिल्लीला जायचे आहे. त्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे भाकित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते माण तालुक्यात दुष्काळी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माढा लोकसभेच्या जागेसंदर्भात भाष्य केले. दौऱ्यात पवार यांनी माण तालुक्यातील अनेक चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
माढा मतदारसंघातील विजय संदर्भात भाष्य करताना शरद पवार म्हणाले, दहा दिवसांनी संजय शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण दहा दिवसांनी संजय शिंदे आमच्यासोबत दिल्लीला येणार आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल. असे भाकित पवार यांनी वर्तवले. तसेच त्यांनी उपस्थित समुदायला प्रश्न विचारत म्हणाले "तुम्ही त्यांना मतदान केले आहे ना.." त्यावर सर्वांनी 'हो' म्हणून उत्तर दिले. यावेळी त्यांच्यासोबत संजय शिंदे हेही उपस्थित होते. त्यांनाही हा प्रकार पाहून हसू आवरले नाही.