महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचे नवनियुक्त खासदार नाईक-निंबाळकरांनी काढली स्वपक्षीय नेत्यांचीच लायकी

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निंबाळकरांना आमदार जयकुमार गोरेंची संगत सोडण्याचा सल्ला दिला होता.

खासदार नाईक-निंबाळकरांनी भाजप नेत्यांचीच काढली लायकी

By

Published : Jun 23, 2019, 7:43 PM IST

सातारा- लायकी आणि माहिती नसणारे काही महाभाग पाणी आणण्याची भाषा करुन जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र, असे कितीही 'लुंगे-सुंगे' एकत्र आले, तरी हिंदकेसरी जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्याची त्यांची लायकी नाही, असे वक्तव्य करत माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेते आणि माजी आमदार दिलीप येळगावकरांसह अनिल देसाई यांच्यावर टीकेची तोफ डागली. ते शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते.

आंधळी धरणात जिहे-कठापूर योजनेच्या जॅकवेल पंप हाऊसचे सर्वेक्षण आणि अन्वेक्षण विभागाच्या कामाचे शनिवारी भूमिपूजन नुकतेच पार पडले. यावेळी खासदार निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निंबाळकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात कोणी काय उद्योग केले, हे बाहेर काढणार आहे. त्यामुळे निंबाळकर यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांनी केलेल्या कामावर अविश्वास व्यक्त केला आहे. परिणामी त्यांच्या या भूमिकेमुळे नवा वाद पेटला आहे.

खासदार पक्षाविरोधात काम करणार का?

येत्या 3 महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. आमदार जयकुमार गोरे तुर्तास काँग्रेसमध्ये आहेत. निंबाळकरांनी माणमधून तिकीटाची खात्री दिल्यास ते भाजपमध्ये उडी मारतील. परंतु, तिकीट नाही मिळाले तर निंबाळकरांना गोरेंचा पैरा फेडावा लागेल, त्यानुसार ते पक्षाच्या विरोधात जाऊन गोरेंचे काम करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

पक्षश्रेष्ठींकडे खासदारांची तक्रार -

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निंबाळकरांना आमदार जयकुमार गोरेंची संगत सोडण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा निंबाळकरांनी त्याला काहीच उत्तर दिले नव्हते. त्याचा वचपा खासदारांनी या कार्यक्रमातून काढल्याचे मानले जात असले तरी खासदारांच्या वक्तव्याने भाजपचे नेतेच नव्हे तर निष्ठावंत कार्यकर्तेही दुखावले गेले आहेत. त्यामुळे यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details