महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईहून चालत गावी आलेल्याने डोक्यावर दगड आपटून केला धिंगाणा!

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा पोलिसांनी सील केल्या आहेत. या वातावरणात एक महाशय मुंबई ते सातारा पायी चालत आले; आणि...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 14, 2020, 11:29 PM IST

सातारा - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा पोलिसांनी सील केल्या आहेत. या वातावरणात एक महाशय मुंबई ते सातारा पायी चालत आले. पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर हातावर शिक्का मारून घेण्यास नकार देत चक्क डोक्यावर दगड आपटून घेत गोंधळ केला.

संग्रहित छायाचित्र
काही महाभाग शासनाचे नियम धाब्यावर बसवून जिल्ह्यात लपून प्रवेश करत आहेत. कोरेगाव तालुक्यातील पोपट बाळकृष्ण जगताप या व्यक्तीने पोलिसांचा डोळा चुकवत साताऱ्यात प्रवेश केला. ही बाब निगडी ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी गावातील पोलीस पाटलांच्या निदर्शनास आणली. पोलीस पाटलांनी जगताप यांना सरपंच आणि आशा आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यासाठी विनंती केली. यावेळी जगताप यांनी सर्वांना शिवीगाळ करत शिक्का मारून घेण्यास नकार दिला.

हे समजताच रहिमतपूर पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी निगडी गावात दाखल झाले. पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नये, यासाठी त्याने स्वतःच्या डोक्यातच दगड मारून घेतल्याने बाका प्रसंग उभा राहिला. गावातील काही सुजाण नागरिकांच्या मध्यस्तीमुळे अखेर जगताप यांना रहिमतपूर येथील ब्रम्हपुरीच्या कोरोना केअर सेंटरवर १४ दिवसांसाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनसाठी दाखल केले. रहिमतपूर पोलीस ठाण्यात संबधित व्यक्तीवर जिल्हाबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details