सातारा - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार यांनी शशिकांत शिंदेना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
कोरेगावमधून शरद पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज हेही वाचा -पवारांचे अचूक टायमिंग! ईडीची पीडा राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर?
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, मतदारसंघातील महिला वर्ग, शेतकरी, युवक यांच्यासाठी विधानसभेत आणि रस्त्यावर उतरून आवाज उठवणारे फक्त शशिकांत शिंदे आहेत. पवार भर उन्हात शिंदेचा अर्ज भरण्यासाठी रॅलीत सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा सहभागी झाले होते.
हेही वाचा -भारत भालकेंसह दौलत दरोडांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ
दरम्यान, रॅली मध्ये कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत संपूर्ण कोरेगाव शहरात जयघोष करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.