महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Heavy Rainfall In Koyna Catchment Area: जोरदार पावसामुळे कोयना पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील ( Koyna Catchment Area ) महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल 129 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगर येथे 74 मिलीमीटर तर नवजा येथे 118 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी 2045 फूट झाली आहे. पुर्वेकडील सिंचनासाठी पायथा वीजगृहात 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Koyna catchment area
कोयना धरण पाणलोट क्षेत्र

By

Published : Jul 5, 2022, 5:29 PM IST

सातारा -कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ( Heavy Rainfall In Koyna Catchment Area ) वाढल्याने धरणात प्रतिसेकंद 14 हजार 152 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीने वाढ ( Dam Water Increased By 1 TMC ) झाली आहे. सध्या धरणात 16 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. पूर्वेकडील सिंचनासाठी पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद - कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल 129 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगर येथे 74 मिलीमीटर तर नवजा येथे 118 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पावसाला सुरूवात झाल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाण्याची पातळी 2045 फूट झाली आहे. पुर्वेकडील सिंचनासाठी पायथा वीजगृहात 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पावसाचा जोर आणि पाण्याची आवक वाढली -संपुर्ण जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने कोयना धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला होता. पश्चिमेकडील वीजनिर्मिती ठप्प होण्याच्या मार्गावर होती. अशातच आता पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासात धरणात प्रतिसेकंद 14 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे.

दोन दिवसांत पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ -कोयना धरणातील पाणीसाठा 13 टीएमसीवर आला होता. मात्र, दोन दिवसांत पावसाचे आगमन झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली असून धरणातील पाणीसाठा 16 टीएमसी झाला आहे.

हेही वाचा -Narvekar Meet Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणखी मोठी घडामोड? मिलिंद नार्वेकर आणि फडणवीसांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details