महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: साताऱ्यात 'गुलमोहर डे' झाला ऑनलाईन साजरा

मे महिन्यात लाल-केशरी फुलांनी गुलमोहराचे झाड बहरून येते. फुलांनी नखशिखांत डवरून वार्‍याच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरायचा, हा गुलमोहराचा स्थायीभाव दरवर्षी अनुभवाला येतो. गुलमोहरांची हे फुलने गेली २० वर्षे सातारकर साजरे करत आहेत. साताऱ्यात एक मे हा दिवस 'गुलमोहर डे' म्हणून साजरा केला जातो.

Gulmohar
गुलमोहर

By

Published : May 2, 2020, 8:27 AM IST

सातारा -वैशाख महिना लागला की निसर्गात लाल-गुलाबी रंगांची मुक्त उधळण सुरू होते. जागोजागच्या गुलमोहराच्या झाडांना बहर येतो. गुलमोहरांची हे फुलने गेली २० वर्षे सातारकर साजरे करत आहेत. साताऱ्यात एक मे हा दिवस 'गुलमोहर डे' म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मात्र, कोरोनामुळे हा महोत्सव ऑनलाईन साजरा करण्यात आला.

गुलमोहर डे विषयी माहिती देताना हर्षल राजेशिर्के

मे महिन्यात लाल-केशरी फुलांनी गुलमोहराचे झाड बहरून येते. फुलांनी नखशिखांत डवरून वार्‍याच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरायचा, हा गुलमोहराचा स्थायीभाव दरवर्षी अनुभवाला येतो. त्याची आठवण ठेवणारा वर्षातला एक दिवस असावा, या भावनेतून गुलमोहराला अर्पण केलेला दिवस म्हणून 'गुलमोहर डे' साजरा करण्याची पद्धत सातार्‍यात सुरू झाली.

गुलमोहर डे आयोजना मागील भूमिका स्पष्ट करताना सागर गायकवाड

साताऱयातील पोवईनाक्यावरुन पोलीस कवायत मैदानाकडे जाणाऱया रस्त्यावर दुतर्फा गुलमोहराची अनेक झाडं आहेत. याच रस्त्यावर दूधसंघाजवळील गुलमोहराच्या मोठ्या वृक्षखाली हा महोत्सव साजरा केला जातो. या वृक्षा प्रति कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा, व्यक्त करण्यासाठी साताऱ्यातील चित्रकार, कवी, शिल्पकार, छायाचित्रकार आणि संवेदनशील नागरिक एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात. वृक्षाला पाणी घालून या उत्सवाची सुरुवात होते. मनोगते, कविता, चित्र, प्रात्यक्षिक, मांडण शिल्प आणि लहान मुलांसाठी चित्रस्पर्धांचे आयोजन येथे केले जाते.

दिवगंत ज्येष्ठ कवी ग्रेस यांनाही या महोत्सवाने मोहिनी घातली होती. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्यांची इच्छा मात्र, अपुरीच राहीली, याची सातारकर रसिकांना खंत आहे. य‍ावर्षी कोरोनाच्य‍ा संकटामुळे रेड झोनमधील सातारा लॉकडाऊन आहे. त्यामुळे कवी, चित्रकार, छायाचित्रकार आदी मंडळींनी आपापले कलाप्रकार सोशल मिडीयाद्वारे जनतेपुढे मांडले.

ABOUT THE AUTHOR

...view details