सातारा- शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत हर-हर महादेवच्या जयघोषाने मुंगी घाट दुमदुमून गेला. सायंकाळी भुतोजीबुवा तेली यांची मानाची कावड मुंगी घाटातून मानवी साखळी करून या घाटातून कावडवर घेतली गेली. कावडवर आल्यानंतर शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. यात्रेत भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
शिखर शिंगणापुरात यात्रा; 'हर-हर महादेव'च्या जयघोषात मुंगी घाट दुमदुमला
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत हर-हर महादेवच्या जयघोषाने मुंगी घाट दुमदुमून गेला. सायंकाळी भुतोजीबुवा तेली यांची मानाची कावड मुंगी घाटातून मानवी साखळी करून या घाटातून कावडवर घेतली गेली.
शिखर शिंगणापूर हे उदयनराजे भोसले यांचे खासगी मालकीचे देवस्थान आहे. या ठिकाणी तीन दिवस चालू यात्रा सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी इंदोरचा राजा कालगावडे यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. तसेच सर्व भक्तांना उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिंगणापूर यात्रेत दुष्काळी परिस्थितीचे सावट जाणवत होते. त्यामुळे यावर्षी भाविकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. तर लोकसभा निवडणुकीचा हंगाम असल्याने भाविक यात्रेकरूंच्या प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. प्रशासकीय यंत्रणेने काही प्रमाणात सोयीसुविधा दिल्या नसल्याने नागरिक व भावीक भक्तांमध्ये नाराजी दिसून आली. पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवून यात्रा उत्साहात पार पाडली.