महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटणमध्ये भीषण आगीत दोन दुकाने जळून खाक; आगीत 70 लाखांचे नुकसान

नवीन बसस्थानक परिसरात धांडे पुलानजीक कराड-चिपळूण मार्गाजवल पाटण येथील सुधीर पाटणकर (रा. चाफोली रोड पाटण) यांचे सुप्रिया शॉपी आणि सुप्रिया कोल्ड्रींक्स मस्तानी अँड आईस्क्रीम पार्लरचे मोठे दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमाराला दुकानाला अचानक आग लागली.

By

Published : Mar 17, 2020, 8:21 PM IST

satara
पाटणमध्ये भीषण आगीत दोन दुकाने जळून खाक; आगीत 70 लाखांचे नुकसान

सातारा -पाटण शहरातील धांडेपुलानजीक असलेल्या सुप्रिया शॉपी आणि सुप्रिया कोल्ड्रींक्स पार्लर या दोन दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. आज (मंगळवारी दि. 17) सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नसून आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. घटनेचा पंचनामा पाटणचे तलाठी जयेश शिरोडे यांनी केला असून यात दुकान मालक सुधीर भिकाजी पाटणकर यांचे तब्बल 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

नवीन बसस्थानक परिसरात धांडे पुलानजीक कराड-चिपळूण मार्गाजवल पाटण येथील सुधीर पाटणकर (रा. चाफोली रोड पाटण) यांचे सुप्रिया शॉपी आणि सुप्रिया कोल्ड्रिंक्स मस्तानी अँड आईस्क्रीम पार्लरचे मोठे दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमाराला दुकानाला अचानक आग लागली. दुकानात रेडीमेड कपड्यांचा माल असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातून मोठमोठे धुराचे लोट बाहेर येत होते. दुकानाला आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या लोकांनी दुकान मालक आणि पाटणच्या अग्निशामक दलाला याची माहिती दिली.

हेही वाचा -छत्रपती घराण्याचे कुलदैवत असणारे शिखर शिंगणापूर मंदिर बंद

दुकानाला पुढील बाजूस दोन ते तीन शटर असल्याने आग विझविण्यात ग्रामस्थांना अडचण येत होती. काही वेळाने अग्निशामकचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर दुकानाचे शटर उचकटून पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या आगीत दुकानातील कोल्ड्रिंक्सचा माल, मोठे मोठे फ्रीज, संपूर्ण फर्निचर, गॅस किचन यांच्यासह रेडीमेड कपडे जळून खाक झाले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details