महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांशी वाद झालेल्या डीवायएसपीला नागपुरात पदोन्नती

दोन वर्षापूर्वी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि कॉंग्रेस नेत्यांशी वाद झालेल्या पोलीस अधिकाऱ्याची नागपुरात पदोन्नती होऊन बदली झाली आहे. कराडचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलीस अपअधीक्षक सुरज गुरव
पोलीस अपअधीक्षक सुरज गुरव

By

Published : Oct 1, 2020, 8:22 PM IST

सातारा - कराडचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांची सहायक पोलीस आयुक्त म्हणून नागपूरला पदोन्नतीवर बदली झाली आहे. दोन वर्षापूर्वी कोल्हापूर महापौर निवडीवेळी विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेत्यांशी त्यांचा झालेला वाद गाजला होता. हसन मुश्रीफ आता सत्तेत असताना गुरव यांना पदोन्नती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलीस उपअधीक्षक गुरव यांची चिपळूणहून कऱ्हाडला एक वर्षापूर्वी 22 सप्टेंबर 2019रोजी बदली झाली होती. गुरव यांनी पदभार स्वीकारताच गुंड टोळ्यांना हिसका दाखवायला सुरूवात केली. रस्त्यावर वाढदिवस साजरा करत तलावरीने केक कापणाऱ्यांना, फटक्यांची आतषबाजी करून शांततेचा भंग करणाऱ्यांना पोलिसी हिसका दाखवून गुरव यांनी वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर गुंडगिरीची स्टेटस् ठेवणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्यादेखील दाखविला. गुरव यांनी दोन मोक्काच्या आणि एक स्थानबद्धतेची कारवाई केली. कोरोनाकाळात 'कराडची माणुसकी' नावाचा ग्रुप तयार करून अन्नधान्याची कीट गरजूंपर्यंत पोहोचवून कोविड योद्ध्याची भूमिका त्यांनी पार पाडली. अशात सूरज गुरव यांची सहायक पोलीस आयुक्त म्हणून नागपूरला बदली झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details