कराड (सातारा) -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Pruthiraj Chauhan Star Campaigners From Congress ) यांच्याकडे उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि गोवा निवडणूक प्रचार रणनीतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी ( Congress Leader Sonia Gandhi ) यांच्या सूचनेनुसार हा निर्णय झाला आहे. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण लखनऊला ( Pruthviraj Chauhan Went To Lucknow ) रवाना झाले आहेत. तिथे त्यांच्या पत्रकार परिषदा होणार असून प्रचारातदेखील ते सहभागी होणार आहेत.
व्हर्चुअल प्रचाराद्वारे मांडणार काॅंग्रेसची भूमिका -
पाच राज्यांच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीने उतरलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने व्हर्चुअल पद्धतीने प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. व्हर्चुअल प्रचार तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तरप्रदेश, उत्तराखंड व गोवा या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविली आहे.