सातारामुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वरात CM Eknath Shinde in Mahabaleshwar आल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी नागरीकांची प्रचंड गर्दी झाली होती, गर्दीत ढकलाढकली झाली. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि पोलीस नागरीकांना ओरडले CM Eknath Shinde Slapped Security Guards . त्यावर ही सगळी माणसे आपलीच आहेत. लोक काय मला मारताहेत का? मी काय मरतोय का? अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांना झापत सामान्यांबद्दलची आपुलकी दाखवली.
महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 214 कोटींच्या निधीला मंजुरी देत CM Eknath Shinde Mahabaleshwar Tourism प्रतापगड संवर्धनाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना प्रशासनाला केली. आमचे मंत्रिमंडळ अॅक्टिव्ह मोडवर आणि फिल्डवर असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने राज्याला प्रगती पथावर नेऊ, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दोन दिवसांच्या महाबळेश्वर दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामांच्या प्रस्तावांबाबतची माहिती घेतली. CM Eknath Shinde Mahabaleshwa Visit
मंत्रालय स्तरावरील प्रलंबित कामे मार्गी लावूसातारा जिल्ह्यातील विकासाचे अनेक प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रलंबित प्रस्तावांची एकत्रित यादी करुन देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केली. संबंधित विभागाचे मंत्री व अधिकार्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मार्गी लावले जातील. प्राप्त निधीतून दर्जेदार विकासकामे करावीत, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
महाबळेश्वरातील पार्किंगच्या दोन वाहनतळांसाठी निधी देणारमहाबळेश्वरमधील पार्कींगचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येण्यासाठी एसटी डेपो आणि रे गार्डन येथे वाहनतळ उभारण्यात यावेत. त्यासाठी निधी दिला जाईल. महाबळेश्वरसह परिसरातही पर्यटन वाढीसाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 17 प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करावीत. जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच उद्योग वाढीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी विभागीय अधिकारी दर्जाचे पद निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
भिलारचा ब वर्ग पर्यटनस्थळाचा प्रस्ताव सादर करापुस्तकाचे गाव भिलारला ब दर्जाचे पर्यटनस्थळ करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. उन्हाळ्यात तापोळा परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तेथे पाण्याची सोय करण्यासाठी सर्व्हेक्षण करावे. सुरुर-वाई-पोलादपूर या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असून जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते विकास, रोजगार सुविधांसह सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोणी किती टीका करायची हे ज्याचे त्याने ठरवायचेराज्य प्रगती पथावर असल्याचे आम्ही आमच्या कामातून दाखवून देऊ. मी कोणावरही टीका करणार नाही. मात्र, कोणी किती टीका करायची, हे ज्याचे त्याने ठरवायचे, असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात सोळशी येथे साडेसात टीएमसीचे नवीन धरण प्रस्तावित केले असून सुरूवातीच्या तांत्रिक कामांसाठी दोन कोटी रुपयांच्या निधीला तातडीची मंजुरी दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचाCM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पुण्यातील चांदणी चौकात येणार