सातारा - शहरातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी आणि पोलिसांनी मंगळवारी जवळपास अडीचशे कुटुंबीयांना पंधरा दिवस पुरेल इतक्या किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. यामध्ये पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, 1 किलो खाद्यतेल, चटणी, डाळी, चहा पावडर, तीन किलो साखर अशा वस्तुंचा समावेश आहे. यापुढेही गरज असल्यास अशा जीवनावश्यक वस्तूंची मदत नागरिकांना करणार असल्याचे मुस्लिम बांधवांनी यावेळी सांगितले आहे.
लॉकडाऊन इफेक्ट : साताऱ्यात पोलीस आणि मुस्लिम बांधवांकडून २५० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या संचारबंदीत हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबीयांना दोन वेळचे अन्न मिळणे अवघड झाले आहे. अशाच कुटुंबीयांना भोजन मिळावे, यासाठी अनेक मदतीचे हात आता पुढे सरसावले आहेत.
हेही वाचा...कामाच्या शोधात गेलेले नांदेडचे मजूर तेलंगणात अडकले; खाण्या-पिण्याची सोय करण्याची मागणी
कोरोनामुळे राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. जवळपास सर्वच व्यापार आणि व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने दोन वेळचे अन्न कसे मिळवावे ? हा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहिला आहे. मात्र, अशा परिस्थितीत पोलीस आणि मुस्लिम बांधवांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून शहरातील या गरजूंना एक महिना पुरेल इतका किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.