सातारा - भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच भाजपच्या माजी आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रासप यांनी साताऱ्यात भाजपाच्या विरोधात एकी केल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी माण खटाव मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा होणार आहे. 'आमचं ठरलंय' असा अशी घोषणा आता विरोधकांनी दिली आहे. मात्र, इनकमींगच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - उदयनराजेंचा भाजप प्रवेश दिल्लीतच होणार! चंद्रकांत पाटलांना आशावाद
यावेळी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, रासप, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह सर्व पक्षातील सर्वपक्षीय प्रमुख नेते या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सातारा जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात गाजत असलेल्या 'आमचं ठरलंय' गटाच्या आजपर्यंत अनेक गुप्त बैठका झाल्या आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, तसेच शेखर गोरे यांच्या प्रवेशांनी जिल्ह्यातील राजकारण पुन्हा फिरू लागले आहे.